पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उरण मधून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. समुद्रात नैदलाच्या स्पीड बोटने खासगी प्रवासी बोटनीलकमल या बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे . सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास निलकमल बोट मध्ये क्रू मेंबर यांच्या सह एकूण ८६ जण होते घेऊन मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून निघून ती बोट एलिफंटाकडे जात असताना नैदलाच्या स्पीड बोटीने उरण कारंजा जवळ या खासगी नीलकमल बोटाला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.दरम्यान या घटनेत एकूण १ जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या दुर्घटनेत बोटीतील ७७ जणांना रेसक्यू करण्यात आले आहे.या दुर्घटनेत ५ प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या अपघातात खासगी प्रवासी नीलकमल बोट ⛵ बुडाली आहे.दरम्यान या खासगी बोटीला नैदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी माहिती नुसार बोट मध्ये ५ क्रूर मेंबर यांच्यासह ८६ जण असल्याची माहिती मिळत आहे.यात ५ प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.तर एक जणांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती मिळत आहे.बेपत्ता प्रवासी यांचा शोध घेतला जात आहे.दरम्यान आता रेस्कू ऑपरेशन थांबवले आहे. आता मदती साठी समुद्रात गेलेल्या बोटी देखील बाहेर आल्या आहेत.दरम्यान रेस्कू करण्यात आलेल्या ६६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.