Home Breaking News महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबर मध्ये फार्म भरलेल्या महिलांना मिळणार ९...

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबर मध्ये फार्म भरलेल्या महिलांना मिळणार ९ हजार रुपये

29
0

पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीं संदर्भात अपडेट आली असून.दरम्यान विधान सभा निवडणुकांच्या आधी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली होती.त्याच योजनेचा महायुती सरकारला निवडणूकीत खूप मोठा फायदा झाला आहे.सर्वप्रथम या योजना मध्ये लाडक्या बहिणींना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात आले होते.व तसेच महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर हिच रक्कम २ हजार १०० रुपये करण्याचा वादा करण्यात आला होता.दरम्यान या योजनेत सप्टेंबर महिन्यांपूर्वी फार्म भरलेल्या महिलेला आता डिसेंबर महिन्यात ९ हजार रुपये एकदम मिळणार आहेत.तसेच २ हजार १०० रुपये हे मार्च महिन्यात मुंबईत होणाऱ्या अधिवेशनात ठराव होऊन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत एकूण ५ हाप्ते बॅंकेत जमा झाले आहेत.आता या महिला ७ व्या हाप्तेची वाट पाहत आहेत.दरम्यान ७ वा हाप्ता डिसेंबर महिन्यात येणार असून अद्याप त्याची तारीख ठरलेली नाही.दरम्यान ज्या महिलांनी योजना सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात फार्म दाखल केला आहे. परंतु त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांच्या बॅक खात्यात एकदम ९ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.दरम्यान मिडिया रिपोर्ट नुसार ज्या महिलांनी या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात फार्म दाखल केले होते.पण त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा नाही.त्यांचे आधार कार्ड व आणि बॅक खाते लिंक नव्हते व अशा महिलांना पैसे मिळाले नव्हते.मात्र आता या महिलांना सहा महिन्याचे एकदम हप्ते येऊ शकतात. दरम्यान लाडक्या बहिणींचे लक्ष आता डिसेंबर महिन्याचा हाप्ता केव्हा जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान  डिसेंबर व जानेवारी महिन्याचा हाप्ता एकदम दिला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.दरम्यान महायुती सरकारने निवडणूकीत महायुती सरकारने स्पष्ट बहुमत मिळाले तर लाडक्या बहिणींना दरमहा २ हजार १०० रुपये देणार असा वादा केला होता.याकडे देखील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की.मार्च प्रर्यत थांबा दरम्यान मार्च महिन्यात मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना दरमहा २ हजार १०० रुपये दिले जातील.असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Previous articleगृहखाते भाजपाकडेच अन्य खाते पवार व शिंदेंना देऊन भाजपने केली त्यांची बोळवण
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार नाराज छगन भुजबळ यांची घेणार भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here