Home Breaking News मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार?

मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार?

30
0

पुणे दिनांक १८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेलें जेष्ठ व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे आज बुधवारी दुपारी १२ वाजता जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.दरम्यान पत्रकार परिषद पूर्वी त्यांनी काल येवला व नाशिक येथे कार्यकर्ते व नेते मंडळी यांच्या सोबत चर्चा देखील केली आहे.तसेच वाह रे दादाचा वादा,कसला वादा अन् कसला दादा,असं म्हणत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.तसेच नाराज असलेलें छगन भुजबळ यांच्याशी अजित पवार.प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांनी संपर्क साधला असता भुजबळ यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत.व हे म्हणेल तेव्हा उठायचे आणि बस म्हणेल तेव्हा बसायचे.आणि पक्षात देखील हे त्रिकूटच निर्णय घेतात पक्षाच्या कुठल्याही निर्यात ज्येष्ठांना स्थान व महत्त्व देत नाहीत.अशी देखील पक्ष नेतृत्वावर भुजबळ यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.दरम्यान असा सवाल करुन भुजबळ यांनी पवार तटकरे व पटेल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.त्यामुळे प्रचंड प्रमाणावर नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आज दुपारी पत्रकार परिषद मध्ये काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleछगन भुजबळ यांची उद्या पत्रकार परिषद, भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष
Next articleगृहखाते भाजपाकडेच अन्य खाते पवार व शिंदेंना देऊन भाजपने केली त्यांची बोळवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here