Home Breaking News मुंबईतील काॅग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाची भारतीय जनता पार्टीच्या वतीने तोडफोड, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर...

मुंबईतील काॅग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाची भारतीय जनता पार्टीच्या वतीने तोडफोड, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

111
0

पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील काॅग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयावर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते अचानकपणे कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे.तसेच कार्यालयावर शा‌ई फेकली तसेच प्रचंड प्रमाणावर दगडफेक केली आहे.यावेळी या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.तसेच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 👮 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे.दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य केले या प्रकरणी काॅग्रेस पक्षाच्या वतीने शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.त्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाच्या वतीने आज आंदोलन करुन काॅग्रेस पक्षाचे कार्यालय फोडले आहे.

दरम्यान मुंबईच्या काॅग्रेस कार्यलयाची दगडफेक करून कार्यालया फोडल्यानंतर काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की.पक्षाच्या कार्यालया वर दगडफेक करणे गुंडगिरीची प्रवृत्ती असल्याचे ते म्हणाले.तसेच आता यातून भारतीय जनता पार्टीच्या पोटात काय आणि ओठात काय हे या आजच्या घटनेवरून दिसून येते.भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वतः लक्ष घातले पाहिजे. असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Previous articleकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन
Next articleदिल्लीतील संसदेत धक्काबुक्की प्रकरणी भाजपाकडून राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here