पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट धाराशिव येथून आली असून धाराशिव मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी त्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले आहे.दरम्यान यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान आज नाशिक येथे देखील काॅग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.यावेळी काॅग्रेस पक्षाच्या वतीने अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे.