पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यात दिवसाढवळ्या बस मध्ये एका महिलेची छेड काढणे आरोपीला चांगलेच महागात पडले आहे.दरम्यान या घटनेबाबत सूत्रांनद्वारे मिळालेली माहिती अशी की.बस मध्ये क्रीडा शिक्षका प्रिया लष्करे या प्रवास करत होत्या.त्यावेळी एका मद्यप्राशन केलेल्या प्रवाशांने त्यांची छेड काढली. मात्र शिक्षिका शांत बसली नाही.तर तिने बसमध्येच या मद्यप्राशन केलेल्या प्रवाशाला चांगलाच चोप दिला. व नंतर या मद्यपीला घेऊन थेट पोलिस ठाण्यात गेली व त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.