पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक अपडेट आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते मिळणार असून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महिला व बालकल्याण.कृषी.सहकार.वैद्यकीय शिक्षण.क्रीडा व बंदरे.मदत पुनर्वसन.अन्न नागरी पुरवठा व औषध प्रशासन ही खाती मिळणार आहेत. यात राज्य उत्पादन शुल्क हे खात्य नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे.दरम्यान लवकरच हे खाते वाटप होणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खातेवाटप या प्रमाणे असू शकते.१) अजित पवार – अर्थखाते तसेच राज्य उत्पादन शुल्क.२) मकरंद पाटील – सहकार ३)आदिती तटकरे -महिला व बालकल्याण ४) दत्ता मामा भरणे – कृषी ५)हसन मुश्रीफ -वैद्यकीय व शिक्षण ६) धनंजय मुंडे -अन्न व नागरी पुरवठा असे असणार आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे पोलखोलनामाला मिळाली आहे.