पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभे मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते.तर आज गुरुवारी नागपूरमध्ये विधीमंडळा च्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले.दरम्यान विरोधी पक्षांनी नागपूर येथील संविधान चौकात तसेच विधानभवन परिसरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.यावेळी उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे आमदारांनी आंदोलन केले.
दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी आज नागपुरातील संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आक्रमक पणे आंदोलन केले.हातात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचे फोटो घेऊन आणि घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी चालत सरळ विधानभवनात थेट प्रवेश केला.तसेच विधीमंडळाच्या पाय-यांवर येत “बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान”. तसेच जय भीम जय भीमच्या जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या यावेळी काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार.नितीन राऊत.सतेज पाटील.भाई जगताप. यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदारांनी आंदोलन केले आहे.