पुणे दिनांक १९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती दिल्ली येथून एक शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आली असून.पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत आता भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत आहे.पण आता ही रक्कम दुप्पटीने वाढवून १२ हजार रुपये करण्याची मोठ्या प्रमाणावर शेतकरीवर्गाची मागणी आहे.आता या बाबत १७ डिसेंबर रोजी चरणजितसिंह चन्नी यांनी लोकसभेत शिफारस मांडली.दरम्यान १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये निधीची वाढीची घोषणा होऊ शकते.