पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन चा आज पाचवा दिवस आहे.दरम्यान आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.दरम्यान मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्याला विकासा च्या बाबतीत पुढं घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी आमदार डॉ विश्र्वजीत कदम तसेच पुण्यातील आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते. दरम्यान याबाबतची अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.