पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट राजस्थान येथील जयपूर येथून येत आहे.राजस्थान येथील जयपूर पेट्रोल पंपावर आज सकाळी एलपीजी व सीएनजी दोन ट्रक मध्ये भीषण अशी टक्कर होऊन भीषण असा अपघात झाला.यावेळी पेट्रोल पंपावर असलेल्या इतर वाहनांना यांची आग 🔥 लागल्यानंतर ५ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे तर १२ ते १५ जण या आगीत होरपळले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्याश ही आग आटोक्यात आणण्यासाठी २० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.दरम्यान या आगीच्या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.