पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट कल्याण येथून आली असून कल्याण येथील एका उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबामधील नागरिकांना बेदम मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला यांच्या पोलिसांनी टिटवाळा येथून मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान आज नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.दरम्यान मी मंत्रालयात कामाला असून माझ्या हाताखाली ५० मराठी माणसं झाडू मारायला आहेत अशी बतावणी करणारा शुक्ला हा घाबरून टिटवाळा येथे लपून बसला होता.पोलिसांनी तेथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणात आज संपूर्ण महाराष्ट्रात त्रिव्र असे पडसाद उमटल्या नंतर परप्रांतीय अखिलेश शुक्ला यांची चड्डी पिवळी झाली व तो कल्याण येथून पळून टिटवाळा येथे लपून बसल्याची माहिती पोलिसा ना मिळाली होती.आणि त्याच्या अटकेचे आदेश थेट नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने विधानभवनातून निघाले होते.दरम्यान यापूर्वी मारहाण झालेल्या देशमुख यांनी कल्याण पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद देण्याचा प्रयत्न केला पण त्यांची पोलिसांनी 👮 प्रथम फिर्याद घेतली नाही.जेव्हा हे प्रकरणांचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विधानभवनात दाखल झाल्यानंतर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिल्या नंतर झोपायचे सोंग घेतलेले पोलिस यंत्रणा तातडीने जागी झाली आहे.दरम्यान हे प्रकरण खुपच महाराष्ट्रात चिघळल्या नंतर यातील आरोपी अखिलेश शुक्ला यांने एक व्हिडिओ तयार करुन महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती.याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 👮 लोकोशन द्वारे कल्याण पोलिसांनी टिटवळा येथून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सुरुवातीला मारहाणीत जखमी झालेल्या देशमुख यांची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांनी आता देशमुख ज्या रुग्णालयात दाखल आहेत.तिथे जाऊन जबाब घेतले आहे . दरम्यान आता अभिषेक शुक्ला याला नोकरी मधून तातडीने निलंबित केले आहे.व त्यांची पत्नीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान महाराष्ट्रात नोकरी निमित्ताने आलेल्या परप्रांतीय लोकांची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता अशा परप्रांतीय लोकांची दादागिरी महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही.असा इशाराच आता मुख्यमंत्री यांनी केली आहे.