पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी खळबळजनक अपडेट आली असून.ताम्हिणी घाटात आज शुक्रवारी सकाळी वाॅटरफाॅल पाॅइंटजवळ बस पलटी होऊन मोठा अपघात झाला असून.यात बस मधील अनेक प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.तर काही प्रवासी हे पलटी झालेल्या बस मध्ये अडकले आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांनी तातडीने पोलिस कर्मचारी व बचाव पथक तातडीने रवाना करण्यात आले आहे.सध्या घटनास्थळी बचाव पथक हे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.या अपघातात दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळी पोलिस व रुग्णवाहिका दाखल झाली आहे.या अपघात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ही बस आज सकाळी पुण्यातून कोकणात जाताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे.