Home Breaking News सरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसपीची बदली,’वाल्मिक कराडकर कारवाई होणार ‘पाळेमुळे खोदून काढणार...

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसपीची बदली,’वाल्मिक कराडकर कारवाई होणार ‘पाळेमुळे खोदून काढणार – मुख्यमंत्री फडणवीस

43
0

पुणे दिनांक २० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनात महायुती सरकारवर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.असा प्रहार केला.त्यानंतर आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की.बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक यांची तातडीने बदली करण्यात आली. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच या खून प्रकरणी पाळेमुळे खोदून काढणार असं जाहीर केले आहे.तसेच मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असे आज जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की.बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अंत्यंत गंभीर आहे.या प्रकरणातील पाळेमुळे खोदून काढणार तसेच जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी लागेल.असे त्यांनी यावेळी म्हणाले आहे.लाकडी दांडक्याला काटेरी तारा गुंडाळून संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे.डोळ्यावर मारुन डोळे जाळण्यात आले.याचा मास्टर माईंड कोणी असलातरी सोडणार नाही.तसेच बीड जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करु तसेच वाल्मिक कराड याच्यावर २ कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा व धमकी दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात होणार आहे.तसेच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जर वाल्मिक कराड याचा हात असेल तर त्याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल.असे देखील ते म्हणाले आहेत.दरम्यान या प्रकरणी बोलताना माझ्या मागणीवर अत्यंत समर्पक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो तसेच बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

 

Previous articleआमदार रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
Next articleकल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय शुक्लाच्या टिटवाळा येथून‌ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here