पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून एक अपडेट हाती आली असून.हिवाळी अधिवेशनाचा आज शनिवारी शेवटचा दिवस आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी महायुतीच्या आमदारांसाठी चहापानाचे आयोजन केले आहे.आता बरेच आमदार याठिकाणी पोहोचले आहेत.एकूण २८८ आमदारांना हे आमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान या चहापानानंतर मुख्यमंत्री हे दीक्षाभूमीला भेट देणार आहे.दरम्यान या चहापानांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच अन्य मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.