पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्ली वरुन राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून. संसद भवन परिसरात भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिल्ली पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर काॅग्रेस पक्षाच्या वतीने देखील दिल्ली पोलिस स्टेशन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.दरम्यान दोन्ही फिर्यादी बाबत दिल्ली क्राइम ब्रांचकडे तपास देण्यात आला आहे. दरम्यान १९ डिसेंबर रोजी संसद भवन येथील परिसरात राहुल गांधींनी धक्का दिल्याने भाजप खासदार प्रताप सारंगी खाली पडून त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या वतीने देखील भारतीय जनता पार्टीच्या खासदारांविरोधात आरोप केला आहे की.भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी काॅग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना यावेळी धक्का बुक्की केली आहे.