Home Breaking News नागपूर हिवाळी अधिवेशन आज शेवटचा दिवस

नागपूर हिवाळी अधिवेशन आज शेवटचा दिवस

62
0

पुणे दिनांक २१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान या सहा दिवसांच्या अधिवेशनाच्या कालावधी मध्ये अनेक मोठ्या घटनावर विधानभवनात चर्चा झाल्या यात प्रामुख्याने विरोधी पक्षनेत्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांड तसेच परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना व नंतर झालेली दंगल व पोलिस कोठडीत आंबेडकर अनुयायी यांची हत्या व तसेच कल्याण येथील मराठी कुटुंबाला परप्रांतीय कडून मारहाण असे अनेक घटना घडल्या व यावर  महायुती सरकारच्या वतीने करण्यात आलेली कारवाई या सर्व गोष्टींनी अधिवेशन गाजले आहे.दरम्यान या सर्व घटने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात निवेदन दिले आहे. त्यानंतर आजचा शेवटचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान आज विरोधक नेमकी काय भूमिका घेणार.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागपूर येथे मंत्रीमंडळाचा विस्तार झाला पण अद्याप खाते वाटप झाले नाही.दरम्यान महायुती सरकारचे नागपूर येथील हे पहिले हिवाळी अधिवेशन पण मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.पण खातेवाटप विना हे अधिवेशन चांगलेच गाजले.तसेच अनेकांना या मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने त्या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांवर चांगलीच आगपाखड करुन नागपूर अधिवेशनातून थेट घरचा रस्ता धरला अशा अनेक घटना या अधिवेशनात घडल्या आहेत.

Previous articleआज महायुतीच्या आमदारांसाठी चहापानाचे आयोजन
Next articleकाॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here