पुणे दिनांक २३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी पुण्याहून एक खळबळ जनक अपडेट हाती असून वाघोली येथे मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले आहे.यात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.मृतांत दोन बालकांचा व अन्य एकाचा समावेश आहे.तर सहाजण गंभीर रित्या जखमी झाले असून. या सर्वांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमी मधील अन्य तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास एक मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या १२ जणांना पैकी नऊ जणांना चिरडल्याने हा अपघात झाला आहे.यातील अन्य जण बाजूला झोपल्याने ते वाचले आहेत.अपघातात घटनास्थळी ठार झालेल्या तीन जणांची नावे १) वैभवी रितेश पवार (वय १ वर्षे) २) वैभव रितेश पवार (वय २ वर्षं)३) रीनेश नितेश पवार (वय ३०) अशी नावे आहेत.यातील जखमींना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील तीन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.हे सर्व कामगार असून ते रविवारी रात्रीच अमरावती येथून पुण्यात कामासाठी आले होते. अशी माहिती मिळत आहे.