Home Breaking News बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना हक्कभंगाची नोटीस

बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना हक्कभंगाची नोटीस

75
0

पुणे दिनांक २३ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती गुन्हेगारीचे कृक्षेत्र बीड येथून एक खळबळजनक अपडेट आली असून बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी फोन केल्यास व फोन न उचलल्याने त्यांनी ही नोटीस बजावली आहे.तसेच याबाबतचे राज्याच्या सचिवांना कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहे. दरम्यान बीड जिल्हा आता अशा निष्क्रीय पोलिस अधीक्षकांच्या नाकर्तेपणा मुळे गुन्हेगारीचे कृक्षेत्रच बनले आहे.याला या भागातील काही राजकीय नेत्यांचे देखील गुंडाना पाठबळ मिळत आहे.तसेच बीड मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अगदी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर संपूर्ण भारतात गाजले आहे.तरी राजकीय नेत्वाला कशी कुंभकर्ण सारखी झोप लागली हा एक महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे.बीड मध्ये वाळू माफिया.गरीबांच्या जमीन बळकवणे.कृषी खात्यात वीमा घोटाळा.शासकीय जमीनीवर वीमा घेऊन कोट्यवधी रुपयांची शासनाची दिवसाढवळ्या लुटमार हे सर्व कोण करतंय? यांची देखील तत्कालीन मुख्यमंत्री यांनी घेतली नाही.व परत अशा नालायक लोकांना नवीन मंत्रीमंडळात स्थान देऊन सरकारला नेमका जनतेला काय इशारा द्यायचं आहे.हे न उलगडलेले कोडे तमाम बीड मधील जनता जनार्दन उघड्या डोळ्यांनी बघत आहे.भर विधान भवनात बीड जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांचे वस्त्रहरण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी करुन देखील सरकार अशा लोकांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री करुन काय दिवे लावत आहे.संबंधित व्यक्तीचा मंत्रीमंडळात समावेश करु नये म्हणून अखा बीड जिल्हा घसा कोरडा करुन ओरडत असताना अशा दिवट्या आमदाराला पुन्हा मंत्री करणं हे बीड मधील जनतेला आवडलेलं नाही.दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे पोलिस अधीक्षक हे स्पेशल फेल झाल्यानेच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. दरम्यान पोलिस अधीक्षक यांची बदली करुन हा प्रश्न सुटणार नाही तर तेथील राजकीय नेत्यांचे गुंडांना असलेले पाठबळ यांच्यावर रामबाण औषध करण्याची वेळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तसेच त्यांच्या महायुतीच्या नेत्यांवर एक आवहान आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Previous articleपुण्यात रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने न‌ऊ जणांना चिरडल्याने तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू,तीन जणांची प्रकृती चिंताजनक
Next article‘अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एकत्रित रित्या जमीन ‘दमानिया यांनी केली पोलखोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here