पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सूरत येथून खळबळ जनक अपडेट आली असून.गुजरात मधील सूरतजवळ सौराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे ट्रॅकवरुन घसरली आहे.यात एक्स्प्रेसचे एकूण चार डबे घसरले असून दरम्यान या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.तसेच अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाची टीम व आपात्कालीन पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे.दादर – पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस किम या स्थानकांवरुन दुपारी ३.३२ ला सुटत असताना ही अपघाताची घटना घडली आहे.दरम्यान या ट्रेन अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.