पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट बीड जिल्ह्यातून आली असून महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळातील सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्रित रित्या जमीन बीड जिल्ह्यात आहे.असा खळबळजनक दावाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यांनी केला आहे.दरम्यान महायुती मधील कॅबिनेट मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक खख्य किती आहे.याचे आता धडधडीत पुरावेच बाहेर आले आहेत.यांची जमीन एकत्र .तसेच जगमित्र शुगर्सचे एकूण सहा सातबार डिजीटल दमानिया यांनी डाऊनलोड केले आहे.असे म्हणत त्यांनी पुरावेच सरकारच्या तोंडावर फेकले आहेत .तरी हे सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड मधील आमदार धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपदाच्या सिंहासनावर आरूढ करुन राज्यातील मतदारांना कोणता संदेश देत आहे.बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची दोस्ती शोले मधील जय आणि विरु सारखी आहे.हे संपूर्ण बीड जिल्ह्यातील तमाम मतदार यांना माहिती आहे.आता तरी महायुती मधील सरकार चे डोळे उघडणार आहे का ? दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची जमीन व जगमित्र शुगर्स मधील भागीदारी बाबत पोलखोल केल्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे काय प्रति उत्तर देणार पहावे लागणार आहे.