पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून खळबळजनक अपडेट आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व महायुती मधील अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड यांने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत बीड जिल्ह्यातील गुंडागर्दी व दहशती वरुन प्रश्न उपस्थित केला आहे.सदरचा व्हिडिओ जुना आहे.असे असलं तरी नव्याने बीड जिल्हा पोलिस अधीक्षकपदी पदभार स्वीकारलेले पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी परळी शहर पोलिसांन या आदेश दिल्यानंतर परळी शहर पोलिस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.