Home Breaking News पुण्यातील सतीश वाघ यांच्या हत्याची सुपारी पत्नीनेच देऊन केला होता खून आता...

पुण्यातील सतीश वाघ यांच्या हत्याची सुपारी पत्नीनेच देऊन केला होता खून आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्नीला केले गजाआड

95
0

पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील सतीश वाघ यांच्या हत्याची सुपारी चक्क त्यांच्या पत्नीनेच दिली होती.अशी आता नव्याने माहिती समोर आली आहे.आता या नव-यांच्याच हत्याकांडाच्या आरोपा वरुन गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली आहे. दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या 👮 पोलिसांच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आता पुण्यातील राजकीय क्षेत्रात या कुटुंबाचे मोठं वलय होते.त्यामुळे सतीश वाघ यांच्या अपहरण नंतर स्वतः पोलिस आयुक्त यांनी लक्ष घातले होते.पण अपहरण कर्ते यांनी त्यांचा खून कार मध्येच करुन त्यांची बाॅडी यवत जवळ टाकली होती.दरम्यान यात काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. परंतु आता नव्याने सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात नवीनच ट्विस्ट समोर आला आहे.व सतीश वाघ  यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडला आहे.आता सतीश वाघ यांच्या हत्याची मुख्य सूत्रधार त्यांची पत्नीच निघाली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनीच या गुन्ह्याची उकल केली आहे दरम्यान सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार पर्यंत व हत्याचे गूढ उलगडले व पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.तर या प्रकरणी पोलिसांनी सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आता त्यांच्या पत्नीला अटक केली आहे.  पत्नीनेच ५ लाख रुपयांची नव-यांची सुपारी दिली होती.त्यानंतर सतीश वाघ यांचे सकाळीच अपहरण करून त्यांची कार मध्येच 🗡️ चाकूच्या सहाय्याने वार करून खून करण्यात आला होता.व त्यांचा मृतदेह हा यवत जवळील शिंदवणे घाटात टाकून हल्लेखोर पसार झाले होते.दरम्यान वाघ यांच्या हत्या प्रकरणात एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यानंतर या खूनप्रकरणी संपूर्ण मास्टर माईंड त्यांची पत्नीच निघाली आहे. दरम्यान सतीश वाघ हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते.

Previous articleदिल्लीतील संसदेजवळ व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
Next articleहिंगोलीत एस‌आरपीएफच्या जवानाच्या गोळीबारात पत्नीचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here