पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्लीवरून खळबळ जनक अपडेट आली असून दिल्लीत संसदेच्या इमारती जवळ एका व्यक्तीने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.याबाबत दिल्ली पोलिसांनी 👮 घटनेची माहिती दिली आहे.आज बुधवारी एका व्यक्तीने संसदे जवळ स्वतःला पेटवून घेतले आहे.व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला तातडीने उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर संसद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदर घटने बाबत माहिती नुसार पेटवून घेणारी व्यक्ती ही उत्तरप्रदेश येथील बागपत येथील आहे.त्याचे नाव जितेंद्र आहे.त्यांने रेल्वे भवनच्या आत आग 🔥 लावून घेतली.दरम्यान स्थानिक पोलिस व रेल्वे पोलिस तसेच नागरिक यांच्या मदतीने आग आटोक्यात आणून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान वैयक्तिक वादानंतर व्यक्तीने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.