पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक उत्तराखंडातील नैनीताल येथून एक खळबळजनक अपडेट आली आहे.दरम्यान उत्तराखंडातील नैनीताल जिल्ह्यात रोड अपघातात भीमतालमध्ये एक बस खोल दरीत कोसळली तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य २० ते २५ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य तसेच पोलिस व एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दरम्यान यातील जखमींना खोल दरीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बस खोल दरीत कोसळल्यानंतर बचावकार्य टीम घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे येत आहेत. दरम्यान सदर प्रवासी बस दरीत कोसळल्यानंतर प्रशासनाच्या वतीने १५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.दरम्यान नैनीताल येथील स्थानिक प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत कार्य हाती घेण्यात आले आहे.यात दुर्दैवाने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.यात एक महिला व दोन पुरुषाचा मृत्यू झाला आहे.अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. दरम्यान ऋषीकेश ते देहरादून रस्त्यावर भीषण अपघात झाला असून यात यात बस अनियंत्रित झाल्या मुळे अपघात झाला असून बस मध्ये एकूण ४५ प्रवासी होते.हे सर्व विद्यार्थी असून ते सर्व क्रीडा महाकुंभात सहभागी होण्यासाठी दून येथे जात होते.याचवेळी दुर्दैवी घटना घडली आहे.