पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी खळबळजनक अपडेट नाशिक जिल्ह्यातून आली असून नाशिकच्या पेठ हरसुल सुरगाणा भागात भूकंप सदृश्य सौम्य धक्के जाणवले आहेत.दरम्यान अचानकपणे धक्के जाणवल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात मानकपूर आडगाव.भुवन धानपाडा.या भागात रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य सौम्य धक्के जाणवले.दरम्यान भूकंपाच्या धक्क्यांची नोंद नसलेतरी स्थानिक तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला या बाबतची माहिती सादर करण्यात आली आहे. दरम्यान या भागात भीतीचे वातावरण आहे.दरम्यान या घटनेत अद्याप कोणतीही हानी न झाल्याची माहिती मिळत आहे.