पुणे दिनांक २५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक हिंगोलीतून खळबळ जनक अपडेट आली असून.हिंगोलीत राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने त्याच्या कुटुंबीयांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या दरम्यान या गोळीबारात जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.तसेच दीड वर्षांच्या चिमुकल्यासह सासू आणि एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव विलास मुकाडे असे आहे.त्यांने कशामुळे गोळीबार केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.तसेच गोळीबार केल्या नंतर राज्य राखीव पोलिस दलाचा जवान हा फरार झाला आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहेत.