पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी जळगाव येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.जळगाव मध्ये कालिका मंदिराजवळ एका डंपरच्या अपघातात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू अपघातात झाला.सदरच्या अपघातानंतर गावकरी चांगलेच संतप्त झाले व त्यांनी अपघातग्रस्त डंपरच चक्क पेटवून दिला .व मुंबई ते नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन सदर रस्ता रोखून धरला यावेळी संतप्त झालेल्या जमावाने संताप व्यक्त करत पोलिसांवर दगडफेक केली.दरम्यान यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी 👮 जमावांवर लाठीचार्ज केला आहे.सध्या परिस्थिती निवाळली असलीतरी या भागात तणाव निर्माण झाला आहे.दरम्यान आज जळगावात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत.