Home Breaking News पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकल्या बहिणी खेळताना गायब, रात्रीच्या सुमारास शहराच्या...

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकल्या बहिणी खेळताना गायब, रात्रीच्या सुमारास शहराच्या बाहेर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळले एकच खळबळ

182
0

पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. राजगुरुनगर येथे दोन लहान चिमुकल्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.दरम्यान या घटनेबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक २५ डिसेंबर रोजी या दोन्ही लहान मुली घरा बाहेर खेळत होत्या.त्या खेळताना अचानकपणे बेपत्ता झाल्या.दरम्यान पालकांनी त्यांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत.रात्रीच्यावेळी शहरातील बाहेर एका इमारतीच्या बाजूला ड्रममध्ये त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.दरम्यान या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मृतदेह आढळलेल्या दोन लहान चिमुकल्या मुलीची नावे १) दुर्वा मकवाने.२) कार्तिकी मकवाने  अशी आहेत.दरम्यान या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला का ? व त्यांची हत्या झाली असेल तर कोणत्या कारणामुळे झाली? यांचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान या चिमुकल्या मुलीच्या हत्यामुळे राजगुरू नगर हादरले आहे.दरम्यान राजगुरूनगर पोलिसांनी 👮 दोन्ही मुलींचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? यांचा तपास राजगुरूनगर पोलिस‌ करीत आहेत.

 

Previous articleअपघातानंतर जळगाव मध्ये पोलिसांचा लाठीचार्ज
Next articleलोणावळ्यात बंदोबस्तावर असलेल्या मद्यधुंद पोलिसाकडून ५ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे, पोलिस शिपाई गजाआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here