Home Breaking News भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन

47
0

पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.त्यांना श्र्वसनाचा त्रास असल्याने  एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ठिकाणी त्यांच्यावर ऑक्सिजन सपोर्वटवर  उपचार सुरू होते. त्यांच्या  फुप्फुसात इन्फेक्शन   झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले  त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे.राॅबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्ट द्वारे ही माहिती दिली आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या खासदार प्रियांका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.तसेच काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच खासदार राहुल गांधी हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत.

दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द या प्रमाणे आहे.मनमहोन सिंह  यांचा जन्म पंजाब मधील गाह व आताचे पाकिस्तान सन १९३२ मध्ये झाला.त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे अर्थशास्त्रातील शिक्षण पूर्ण केले.मनमोहन सिंह यांनी सलग दोन वेळा सन २००४ ते २०१४ देशाचे पंतप्रधानपद भूषवले त्या अधी पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी सन १९९१ ते ९६ या काळात अर्थमंत्री म्हणून देखील काम केले आहे.अर्थतज्ज्ञ म्हणून जगात त्यांची ओळख होती.

Previous articleमहायुतीमधील मंत्र्यांच्या हातात पिस्तूल ‘आपला देश असा असणार आहे का ?
Next articleयेणाऱ्या ४८ तासांमध्ये महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात व वा-यांसह अतिमुसळधार पाऊस पडणार पुण्याचा देखील समावेश आय‌एमडी कडून अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here