पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.आता त्यांनी वाल्मिक कराड व महायुतीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे व्हिडिओ एक्सवर पोस्ट केले आहेत.सदरच्या व्हिडिओ मध्ये वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे हे यात आहेत.मुंडे कार चालवत आहेत.तर पुढच्या सीटवर वाल्मिक कराड बसला आहे.तर दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये आताच महायुती सरकार मधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हातात पिस्तूल आहे.आपला भारत देश असा चालणार का ? हे या देशाबद्दल व्हिजन असणार आहे का? असा सवालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.