Home Breaking News महायुती राजवटीत बनावट औषधांचा पुरवठा थांबेना

महायुती राजवटीत बनावट औषधांचा पुरवठा थांबेना

34
0

पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महायुती सरकारच्या राजवटीत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट औषधांचा भस्मासुर पाहयला मिळत आहे.आणी ही सर्व औषधे शासकीय रुग्णालया मध्ये यांचा बिनबोभाट पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.शहरी किंवा ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब रुग्ण या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जातात आणि तिथेच त्यांना बनावट औषधे दिली जातात. तर एकंदरीत हे महायुतीचे सरकार गोरगरीब रुग्णांच्या जीवावर उठले आहे का ? असा आता गंभीर प्रश्न त्यांना सतावत आहे.तसेच राज्यातील धाराशिव तसेच औरंगाबाद व पुणे या रुग्णालयात देखील बनावट औषधांचा सरकारी रुग्णालयात अद्याप देखील बनावट औषधांचा होत असल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान अन्न आणि औषध विभागाच्या तपासणीत  औषधे बनावट निघाली आहेत.दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील घाटीला पाठवलेलं curexim-200 बनावट औषध निघालं आहे.तसेच धाराशिव येथील रुग्णालयातील Amoxicillin या घटकाशिवाय Moxmad 250 चा पुरवठा केल्याचे देखील समोर आले आहे.दरम्यान विशाल एटंरप्राईजेसने हा बनावट औषधांचा पुरवठा केला आहे.अशी माहिती आता समोर आली आहे.दरम्यान या बनावट औषधांच्या रॅकेट मध्ये काही शासकीय आरोग्य खात्यांमधील अधिकारी व दलाल आणि काही राजकीय व्यक्तींचा देखील यात समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या शिवाय खासगी एटंरप्राईजेस वितरक कंपन्या बिनबोभाट बनावट औषधांचा पुरवठा तेपण शासकीय रुग्णालयात करत आहेत.

Previous articleलोणावळ्यात बंदोबस्तावर असलेल्या मद्यधुंद पोलिसाकडून ५ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे, पोलिस शिपाई गजाआड
Next articleमहायुतीमधील मंत्र्यांच्या हातात पिस्तूल ‘आपला देश असा असणार आहे का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here