Home Breaking News लोणावळ्यात बंदोबस्तावर असलेल्या मद्यधुंद पोलिसाकडून ५ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे, पोलिस शिपाई...

लोणावळ्यात बंदोबस्तावर असलेल्या मद्यधुंद पोलिसाकडून ५ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे, पोलिस शिपाई गजाआड

54
0

पुणे दिनांक २६ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून आली असून. लोणावळा मध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी 👮 दारुच्या नशात पाच वर्षीय चिमुकली सोबत अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.हा सर्व प्रकार लोणावळा येथील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी घडला आहे.दरम्यान या ठिकाणी बंदोबस्तावर असताना दारु पिऊन चक्क ५ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिस दलात असलेल्या पोलिस शिपाई यांचे नाव सचिन सस्ते असून त्याला या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान या घटनेबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहिती नुसार.सस्ते हा २५ डिसेंबर रोजी लोणावळा येथील विसापूर किल्ला या ठिकाणी बंदोबस्तावर होता .त्यांने कर्तव्यावर असतांनाच मद्यप्राशन केले.या दिवशी नाताळ सण असल्याने येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.त्यांने तेथील एका हाॅटेल मधून भाकरी घेतली तेव्हा त्यांने एक लहान मुलगी रोडच्या कडेने जात असलेली पाहिली व लघुशंकेचा बाहणा करून तो हाॅटेलच्या मागे गेला आणि पाच वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले.यावेळी मुलीने विरोध केला असता तुला चाॅकलेट देतो कुणाला सांगू नकोस असे तो लहान मुलीला म्हणाला.मात्र हा प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला त्या नंतर मुलीच्या पालकांनी झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्या नंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्तावर व दारुच्या नशेत असताना पाच वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस शिपाई सचिन सस्ते याच्या मुसक्या आवळल्या आहेत.जर कायद्याचे रक्षक जर असं वागत असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे  रक्षण कोण करणार असा गंभीर प्रश्न आता महायुतीच्या सरकार मध्ये पाहयला मिळत आहे.हे प्रकरण गंभीर असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

Previous articleपुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकल्या बहिणी खेळताना गायब, रात्रीच्या सुमारास शहराच्या बाहेर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळले एकच खळबळ
Next articleमहायुती राजवटीत बनावट औषधांचा पुरवठा थांबेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here