पुणे दिनांक २७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून घाटकोपर येथून आली असून.मुंबईतील पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील चिराग नगरात एका टेम्पोच्या चालकाने भरघाव वेगाने टेम्पो चालवून ५ ते ६ जणांना चिरडल्याने या दुर्घटनेत एका महिलेच्या मृत्यू झाला आहे दरम्यान अपघात प्रकरणी पोलिसांनी टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की.घाटकोपरच्या चिराग नगर येथे मंडईतून जाताना एका टेम्पोने अनेकांना धडक दिली. दरम्यान भरघाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने मंडईतील अनेक स्टाॅटला धडक दिली.तसेच रोडने जाणाऱ्या लोकांना चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ ते ६ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या अपघात प्रकरणी पोलिसांनी 👮 टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे जखमींना उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान टेम्पो चालक हा नशेत असल्याची माहिती मिळत आहे तसेच संतप्त झालेल्या नागरिकांनी या टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली आहे.