पुणे दिनांक २७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात पुढील ४८ तासांमध्ये ११ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.तसेच अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान २७ व २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान मागील काही दिवसां पूर्वी थंडी पडली होती.व नंतर काही दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडी गायब झाली व उकाडा जाणवत होता.
दरम्यान हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे की.२६ डिसेंबर ते २८ डिसेंबरच्या कालावधीत धुळे.नंदूरबार.जळगाव.नाशिक.छत्रपती संभाजीनगर. अहिल्यानगर.पुणे.जालना.परभणी.बीड.अकोला. अमरावती.बुलडाणा.वाशिम.या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या सर्व जिल्ह्यांना अलर्ट करण्यात आले आहे.तसेच खानदेश मराठवाडा आणि विदर्भ या भागातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.दरम्मान हवामानातील सतत बदलामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.दरम्यान २६ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसासह ढसाळ वातावरणांचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.दिनांक २७ डिसेंबर रोजी खान्देश नाशिक विभाग.मध्य महाराष्ट्र.पुणे विभाग. तसेच उत्तर मराठवाडा.आणि पश्चिम विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतकरी वर्गाने आपल्या पीकांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.असे आवाहन करण्यात आले आहे.