पुणे दिनांक २७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पनवेल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोपिका व कोयल येथील छमछम बारमध्ये पुरुष वेटर पेक्षा महिला वेटर कामांवर ठेवून सदरच्या महिला वेटर ग्राहकांना अश्लील कृत्य करुन तसेच हातवारे करत बीभत्स वर्तन करत असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखेच्या 👮 पोलिसांना मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी सव्वा दहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला त्या वेळी पाच महिला वेटर बारमध्ये सुरू असलेल्या गाण्या वर अश्लील हावभाव तसेच भिभस्त चाळे आणि अंग विक्षेप नृत्य करुन तेथील सहा ग्राहकांना आकर्षित करत होत्या.या प्रकरणी पनवेल येथील तालुका पोलिस ठाण्यात बारचे मॅनेजर.कॅशियर . तसेच पुरुष वेटर.व महिला वेटर तसेच बार चालविणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गुन्हे शाखा १ वाशी.नवी मुंबई.यांनी नवी मुंबई व पनवेल शहर पोलिस स्टेशन हद्दी मधील ग्रिट्स बार अॅन्ड रेस्टोरंट या बारवर कारवाई करत एकूण ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.बारचा मॅनेजर गोपीनाथ गावंड यांच्यासह पुरुष वेटर व महिला असा एकूण ३४ जणांचा समावेश आहे. दरम्यान पनवेल मध्ये अनेक गर्भ श्रिमंत तसेच पेसै वाले या ठिकाणी मौजमस्ती करण्यासाठी येतात. दरम्यान पनवेलच्या बारमध्ये छमछम सुरू झाले आहे. असे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस यांनी नवी मुंबई यांनी ग्रिट्स बार अॅन्ड रेस्टोरंट तसेच पुणे ते पनवेल जुन्या हायवे रोडच्या बाजूला ओएनजीसी.काळुंद्रे येथे नियमांचे उल्लंघन करून बार सुरू असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 दहा वाजता सदर बार येथे पोहोचून कारवाई केली आहे.तसेच नियमानुसार सदर बारला साडेनऊ वाजेपर्यंतच परवानगी असताना देखील हा बार उशिरापर्यंत सुरू होता म्हणून पोलिसांनी 👮 कारवाई केली आहे.