पुणे दिनांक २७ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबईतून एक खळबळजनक अपडेट आली असून.मुंबईत पालघर रेल्वे स्टेशन जवळ जयपूर एक्स्प्रेसने चार जणांना चिरडले.या दुर्घटना मध्ये तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.तर चौथ्या जखमीला तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पालघर रेल्वे स्टेशन जवळ हनुमान मंदिर चौक येथे रेल्वेचे फाटक आहे.दरम्यान हे फाटक उघडे होते का? तसेच हे रेल्वेचे फाटक ओलांडून रात्रीच्या अंधारात चार जणांना रेल्वे न दिसल्याने अपघात झाला का ? आता याचा तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत. दरम्यान पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.