पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्या मधील कुरकुंभ एमआयडीसीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.दरम्यान या स्फोटात एक कामगार गंभीर रित्या जखमी झाला आहे.दरम्यान वृत्त अपडेट होऊ पर्यंत स्फोटात नेमके किती कामगार जखमी झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सागर प्रल्हाद रणभावरे (वय २३ रा.नेवासा जिल्हा अहिल्यानगर) असं गंभीर रित्या भाजलेले कामगार याचे नाव आहे.त्याला उपचारासाठी दौंड येथून पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर स्फोटाची घटना ही आज दिनांक २८ डिसेंबर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून.दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत तपासणी सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे तसेच सुरक्षा अधिकारी अंकुश खराडे.दौंड पोलिस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक गोपाळ पवार.तसेच सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी कंपनीत घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.