पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून खळबळजनक अपडेट हाती आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.तसेच बंदुकीसोबत ज्या व्यक्तींचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत.त्यांचे बंदुकीचे परवाने रद्द करण्याचे आणि तपासण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.दरम्यान आज बीड मध्ये या प्रकरणी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच या वेळी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे व कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर अनेक जणांनी निशाण साधला आहे.