पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक मुंबईतून खळबळ जनक अपडेट हाती असून.मुंबई मधील साकीनाका या भागातील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील खैरानी रोड परिसरातील दोन गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.दरम्यान झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे अग्निशमन दलांच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.अग्नीशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर ही आग विझवण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.दरम्यान ही प्लास्टिकचे दोन्ही गोदाम असून त्यांनाच आज अचानकपणे आग लागली आहे.या आगीत ही दोन्ही प्लास्टिकची गोदामे जळून खाक झाली आहेत.अशी माहिती प्रथमदर्शनी सूत्रांनद्वारे मिळत आहे.