पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी पुण्यातून एक अपडेट हाती आली असून.आता पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दबंगगिरी करणार असाल तर सावध व्हा. कारण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.पुणे पोलिस आता अॅक्शन मोडवर आले आहे.दरम्यान गुंड गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर दोन जणांनी दबंगगिरी केली होती.त्या दोघांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून घेत त्यांच्या सोशल मीडियावरील एकूण ५० रिल्स तातडीने डिलीट करण्यात आले आहे.तसेच त्यांना या प्रकरणी चांगलीच समज देखील देण्यात आली आहे.दरम्यान या नंतर देखील पुण्यात कोणी असा प्रकार करेल त्याच्यावर आता थेट कारवाई केली जाईल.असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.