पुणे दिनांक २८ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्या मुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबतची माहिती आपण बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देखील दिली आहे.असं दमानिया यांनी म्हटले आहे.महायुती मधील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.तसेच वाल्मिक कराडला तातडीने अटक करा अशी देखील मागणी दमानिया यांनी केली आहे.त्या आज बीड मध्ये होत असलेल्या सर्व पक्षीय मोर्चात सहभागी होणार असून तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना देखील भेटणार आहेत.अशी माहिती देखील यावेळी बोलताना अंजली दमानिया यांनी माध्यमांना दिली आहे.