Home Breaking News आज रविवारी पहाटे पुण्यातील कामशेत येथील भावीकांच्या खासगी प्रवासी ट्राॅव्हल्स बसची व...

आज रविवारी पहाटे पुण्यातील कामशेत येथील भावीकांच्या खासगी प्रवासी ट्राॅव्हल्स बसची व ट्रकची समोरा समोर भीषण धडक बस मधील दोन महिलांचा मृत्यू तर अन्य ३२ भावीक गंभीर रित्या जखमी

62
0

पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पंढरपूर येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पंढरपूर जवळ खासगी प्रवासी ट्राॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात आज रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून.या अपघातात दोन भावीकांचा मृत्यू झाला आहे तर अन्य ३२ भावीक हे गंभीर रित्या जखमी झाले असून जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

दरम्यान सदर अपघात प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर जवळील भटुंबरे गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली ‌सदरचा अपघात इतका भीषण होता की बस आणि ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झाला आहे.सदर अपघातात दोन भावीकांचा मृत्यू झाला आहे. बस मधील जखमी भावीकांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत येथील भावीक देवदर्शना करीता पुण्यातील नंदीनी ट्राॅव्हल्स या खासगी बसने गेले होते.सदरच्या अपघातामध्ये बस आणि ट्रकचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर अपघातात बस मधील भवीक बेबाबाई महाळसकर (वय ५५ रा.कामशेत पुणे) व जनाबाई महाळसकर या दोघींचा मृत्यू झाला आहे.सदरच्या अपघातात एकूण ३२ जण जखमी झाले आहेत.काहींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अन्य गंभीर रित्या जखमी झालेल्या एकूण १२ जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Previous articleसीएनजी पुन्हा एकदा महागला वाहन चालकांना झटका
Next articleजेष्ठ नेते शरद पवार गटाचे सर्वच पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here