पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट नुसार आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे.बीड जिल्ह्यातील खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सीआयडीने सुरुवात केली आहे.दरम्यान आता या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड याच्यासह एकूण चार आरोपींची बॅंक खाते गोठवल्या बाबत सूत्रांकडून माहिती मिळत आहे.