पुणे दिनांक २९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी एक अपडेट हाती आली असून.वाहन चालकांना झटका देणारी बातमी समोर येत आहे.आजपासूनच सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.एमएनजीएल कडून सीएनजी दरांमध्ये १.१० रुपये प्रति किलो दरवाढ करण्यात आली आहे.आजपासून सीएनजी साठी आता ८९ रुपये मोजावे लागणार आहेत.दरम्यान मध्यरात्री पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.आता त्यामुळे पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर प्रति किलो ८९ रुपयांवर पोहोचले आहेत.