Home Breaking News ‘एस आय टी व न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल नक्की कोण कुणाचा...

‘एस आय टी व न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल नक्की कोण कुणाचा आका ‘?

48
0

पुणे दिनांक ३० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट हाती आली असून.शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट केली आहे.दरम्यान या पोस्ट मधील फोटोत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेले व महायुती सरकार मधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र वाल्मिक कराड सोबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसत आहेत.तसेत व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.एस‌आयटी व न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल .हाय का नाय मोठा जोक? असे देखील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.दरम्यान वाल्मिक कराड हा आता फरार असून सीआयडीने त्यांचे बॅक खाते गोठवले आहे.तसेच त्याचे दोन्ही पासपोर्ट देखील जप्त केले आहे.तसेच त्यांच्या असलेल्या दोन्ही बायकांची देखील सीआयडीने तब्बल आठ तासांपेक्षा जास्त कसून चौकशी देखील केली आहे.सीआयडीच्या एकूण न‌ऊ टीम बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.तसेच वाल्मिक कराड याच्या शोधात आहेत.केव्हाही वाल्मिक कराड हा त्यांच्या हाती लागू शकतो.तसेच आता विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा देखील महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव आहे.त्यामुळे काही राजकीय नेत्यांच्या सल्ल्याने वाल्मिक कराड हा सीआयडीकडे शरण देखील येण्याबाबत त्याच्यावर मोठा दबाव आणत आहेत.त्यामुळे तो नक्कीच सीबीआयला शरण येण्याची शक्यता दाट दिसत आहे.

Previous articleसरपंच देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीला भक्कम पुरावे मिळाले, आरोपींच्या शोधाकरीता सीआयडी पथकाचे प्रयत्न अखेर वाल्मिक कराड येणार शरण?
Next articleवाल्मीक कराड थोड्याच वेळात पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार कार्यकर्त्यांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here