पुणे दिनांक ३० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे.दरम्यान या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींची बॅंक खाती सीआयडीने गोठवली आहेत. त्यामुळे तो आता दूर जावू शकत नाही.तसेच तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट नसल्याने तो बाहेर देशात देखील जावू शकत नाही.तसेच बॅक खाते गोठवल्यांने त्यांचे आर्थिक बळ आता संपुष्टात आले आहे.पोलिसांनी कराडसह अन्य आरोपींची सुरू स्तारावर नाकाबंदी केली आहे.त्यामुळे आता त्यांना पोलिसांना शरण येण्याशिवाय प्रर्याय नाही अशी एकंदरीत शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर आरोप आहे.
दरम्यान या तपासात सीआयडीकडून आघाडी घेतली आहे.संतोष देशमुख अपहरण झालेल्या स्काॅरपिओ कार मधील ठसे आरोपींशी जुळले आहेत.दरम्यान यातील फरार आरोपींचे पासपोर्ट सीआयडीने रद्द केले आहे.त्यामुळे आरोपी आता बाहेर देशात पळून जाऊ शकत नाही.आताप्रर्यत सीआयडीने एकूण १०० पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित महिलेची देखील चौकशी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ करण्यात आली आहे.तसेच या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींचे मोबाईल देखील सीआयडीला सापडले आहेत.तसेच देशमुख यांची हत्या करतानाचा व्हिडिओ देखील या मोबाईल मधील सापडला असून तसेच हत्या करतेवेळी अन्य लोकांशी झालेलं संभाषण देखील सीआयडीच्या हाती लागले आहे.हे सर्व मोबाईल फाॅरेन्सिकडे तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.तसेच महत्त्वाचे म्हणजे यातील फरार सर्व आरोपींचे बॅक खाती तातडीने गोठविण्यात आली आहे.त्यामुळे एकंदरीत सीआयडी ने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यातील फरार आरोपींची एक प्रकारे चांगलीच नाकाबंदी करण्यात आली आहे.तसेच डीआयडीच्या एकूण नऊ टीम तपास करीत आहेत.जवळपास एकूण १५० सीआयडी अधिकारी यात रात्रंदिवस काम करत आहेत.त्यामुळे यातील फरार आरोपी केव्हाही सीआयडीकडे शरण येऊन शकतात अशी स्थिती आहे.