पुणे दिनांक ३० डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी जळगाव येथून अपडेट आली असून.जळगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या चटई बनवणा-या कंपनीला 🔥 भीषण आग लागली आहे.दरम्यान येथे असलेल्या प्लास्टिक मुळे आग अतिशय वेगाने भडकली असून दरम्यान या आगीत भीषण स्फोट देखील झाला आहे.अशी माहिती देखील मिळत आहे.तसेच या आगीत संपूर्ण चटईची कंपनी जळून खाक झाली आहे.दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व जवळपास २ ते ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान या आगी नंतर या औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.