पुणे दिनांक ३१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन तीन आठवडे उलटले तरी त्यांच्या हत्या मधील मुख्य सुत्रधार व अन्य तीन आरोपी हे अद्याप सीआयडी व जिल्हा पोलिस यंत्रणा यांना सापडले नाहीत.तसेच दिनांक २८ डिसेंबर रोजी सर्वात सर्वपक्षीय तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांचा आक्रोश मोर्चा होऊन देखील महायुतीचे सरकार अद्याप पाहिजे तेवढं गंभीर दिसत नाही.त्यामुळे आज मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व आणि त्यांचे कुटुंबीय आजच्या पत्रकार परिषदेत काय मागणी या महायुती सरकारकडे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान महायुतीतील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षनेते यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून वाल्मीक कराडला अटक करण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे.