Home Breaking News वाल्मीक कराड थोड्याच वेळात पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार कार्यकर्त्यांची गर्दी

वाल्मीक कराड थोड्याच वेळात पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार कार्यकर्त्यांची गर्दी

67
0

पुणे ३१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या खळबळजनक अपडेट नुसार बीड येथील खंडणी प्रकरणातील व मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या चार आरोप असलेला आरोपी वाल्मीकी कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याची सूत्रांनद्वारे खात्रीलायक वृत्त मिळत आहे. दरम्यान आज मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड येथील कायदा सुव्यवस्थेचा विषय संपूर्ण देशभर गाजला आहे.

दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी तसेच सत्ताधारी आमदारांनी महायुतीच्या सरकारला विधानभवनात चांगलेच धारेवर धरले होते.त्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता. दरम्यान सीआयडीने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी यांचे बॅकेची खाती गोठवली होती तसेच त्यांचे पासपोर्ट देखील जप्त करुन यातील आरोपींची नाकेबंदी केली होती.दरम्यान या खूनातील तीन आरोपी फरार झाले आहेत.या खून प्रकरणी कराड हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप मस्साजोग गावाचे सर्व नागरिकांनी केला आहे.तसेच वाल्मीकी कराड यांच्या मागे सीआयडीचे पथक लागले असून  आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिकी कराड हा ११ वाजता सरेंडर करणार आहे.दरम्यान पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. दरम्यान पुण्यातून ४ सीआयडीची विषेश पथके वाल्मिक कराड याच्या शोधा करीता पहाटेच रवाना झाली आहेत.

Previous article‘एस आय टी व न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल नक्की कोण कुणाचा आका ‘?
Next articleसरपंच हत्याप्रकरणी धनंजय देशमुख यांची आज पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here